मुंबई : राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Arvind Inamdar, former Maharashtra Director General of Police (DGP) passed away, earlier today. pic.twitter.com/xwZ7jOZeft
— ANI (@ANI) November 8, 2019
अरविंद इनामदार यांची पोलीस महासंचालक म्हणून कारकिर्द खूप गाजली होती. पोलिस दलातील अयोग्य आणि चुकीच्या गोष्टींवर ते नेहमी भाष्य करायचे. त्यामुळे ते सतत चर्चेत असायचे. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. ते लेखक म्हणून देखील प्रसिध्द होते.