मुंबई – 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आणि या ऐतिहासिक निर्णयाचे अनुकूल प्रतिकूल पडसाद उमटले होते. यातच आज नोटबंदीला तीन वर्ष पूर्ण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांमध्ये सध्या नोटबंदी फेल झाल्याचे मिम्स वायरल होत आहे.
What did India gain out of Demonetisation ?#आओ_मोदी_चौराहे_पर #आओ_मोदी_चौराहे_पर pic.twitter.com/0nq3pIr2Yk
— Bilal Ahmad Shabbu ?? (@bilal_shabbu) November 8, 2019
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून युजर्सने नोटबंदी विरोधात #आओ_मोदी_चौराहे_पर तसेच #BlackDay या हॅशटॅग वापरून मोदी सरकार हल्लाबोल करीत आहे. सध्या या मुद्यांवर सोशल मीडियावर चांगलेच घमासान रंगले आहे. एका ट्विटर युजर्सने ट्विटद्वारे देशातील आर्थिक मंदी अन् बेरोजगारीचा मुद्दा गंभीरबाब नोटबंदीमुळे झाले असल्याचे ट्विट करत #आओ_मोदी_चौराहे_पर हॅशटॅग वापरून नोटबंदीचा निषेध केला आहे.
“₹500 ₹2000”
गरज नसताना आयुष्यात आलात, आणि एक अविभाज्य भाग बनून राहिलात….??#हॅप्पी_बड्डे, बोथ ऑफ यु…. ?????#BlackDay #नोटबंदी pic.twitter.com/c5C99CbbQv— आयुष्याची डायरी… (@semprasha) November 8, 2019
‘गरज नसताना आयुष्यात आलात, आणि एक अविभाज्य भाग बनून राहिलात….’ असे विनोदी ट्विट केले आहे’ तर ‘नोटबंदी म्हणजे न भूतो न भविष्यती घोडचूक’ असल्याचे ट्विट करत #BlackDay या हॅशटॅग वापरून नोटबंदीचा निषेध केला आहे.