नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांचा आज ९१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी पंतप्रधानांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच सर्वपक्षीय नेत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यांनी, “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुमच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Birthday greetings to former PM Dr. Manmohan Singh Ji. Praying for his long and healthy life.
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2022
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक यशाची नवीन उंची गाठली आणि उच्च विकास दर गाठला. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्य देवो, अशी पोस्ट शरद पवारांनी ट्विटरवर केली आहे.
Birthday Wishes to former Prime Minister Dr Manmohan Singh. Under his leadership, India scaled new heights of economic success and reached its highest growth rate.
May God bless him with a long and healthy life. pic.twitter.com/gC3k1P55nw— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 26, 2023
दरम्यान, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यात झाला. हा जिल्हा आता पाकिस्तानात आहे. पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी 1982 ते 1985 या काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून काम केले. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये देखील ते अर्थमंत्रीही होते. 1991 मध्ये भारतात आर्थिक उदारीकरण आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती.
मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 पर्यंत दोन वेळा देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे.देशातील महत्वाच्या राजकारण्यापैकी एक मनमोहन सिंग यांची एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. त्यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रथम श्रेणीसह पदवी मिळवली.
माजी पंतप्रधानांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल पूर्ण केले. त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. UNCTAG सचिवालयात काही काळ काम केल्यानंतर, त्यांनी 1987 ते 1990 दरम्यान जिनिव्हा येथे दक्षिण आफ्रिकन आयोगाचे महासचिव म्हणून काम केले.