भारताचे माजी पंतप्रधान आणि जनता दल (सेक्युलर) चे अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. देवेगौडा यांच्या कार्यालयाने शनिवारी (22 जानेवारी) एक अधिकृत निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, माजी पंतप्रधान आणि जनता दल अध्यक्ष एचडी देवेगौडा कोविड-19 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
Former Prime Minister and Janata Dal (Secular) president HD Devegowda tested positive for #COVID19. He has no symptoms and his health is stable: Office of HD Devegowda
(File pic) pic.twitter.com/EfzjOLr2g3
— ANI (@ANI) January 22, 2022
देवेगौडा यांच्यामध्ये करोनाची कोणतीही गंभीर लक्षणे नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.