पुणे : 2022 च्या हंगामानंतर सानिया मिर्झा आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त होणार आहे. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर सानियाने निवृत्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना सानिया म्हणाली की आता तिच्या शरीराला रिकव्हर होण्यासाठी जास्त वेळ लागतो. मुलासोबतचा सततचा प्रवासही धोकादायक असल्याचेही तीने सांगितले. आपल्या कारकिर्दीत 6 ग्रँडस्लॅम जिंकणारी सानिया मिर्झा ही देशातील टेनिसच खेळाची मोठी ’आयकॉन’ आहे.
सुमारे दोन दशकांच्या कारकिर्दीत सानिया मिर्झाने अनेक चढउतार पाहिले. विजय-पराजयासोबत अनेक वादही पाहिले आहेत. पण प्रत्येक वेळी त्या वादांना धैर्याने सामोरे जावे लागले आहे. त्याला समीक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. देशाच्या विविध भागांतील टेनिस अकादमीत जाऊन सकाळ-संध्याकाळ रॅकेट चालवणार्या मुलींसाठी ती एक आदर्श आहे.
याच पार्श्वभूमीवर लेखातून सानिया मिर्झाच्या टेनिस कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत.
1) सानिया मिर्झा प्रथम 2005 मध्ये चर्चेत आली
2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन सुरु होती. सानिया मिर्झा, दिग्गज टेनिस स्टार सेरेना विल्यम्सशी कोर्टवर भिडत होती. हा स्पर्धेतील तिसर्या फेरीचा सामना होता. सानिया सेरेना विल्यम्सला हरवू शकणार नाही हे सगळ्यांनाच माहीत होते, पण या सामन्यातील सानियाचा उत्साह पाहण्यासारखा होता. सर्व्हिस आणि रिटर्न सर्व्हिसा वेळी अतिरिक्त शक्ती आणि त्य अतिरिक्त शक्तीमुळे तोंडातून बाहेर पडणारा आवाज क्रीडाप्रेमींना थक्क करणारा होता. टेनिस कोर्टवर भारताच्या एका स्टारच्या जन्माचा हा सामना होता.
2) … आणि कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जिंकले
2005 नंतर पुढील 3-4 वर्षे, सानिया मिर्झाने जगभरातील सर्व मोठ्या टेनिस स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी सुरू ठेवली. यादरम्यान ती ग्रँड स्लॅममध्ये ‘सीड’ मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. या दरम्यान तीन काही ड्ब्यूटीए स्पर्धाही जिंकल्या. याशिवाय, सर्व स्पर्धांमध्ये तिसरी किंवा चौथी फेरी गाठणे तीच्यासाठी सामान्य झाले होते.
यानंतर सानियाने आपल्या दमदार खेळातून पुढे जाण्याचा प्रवास सुरू ठेवला. तीच्या ’फोरहँड’ आणि ’व्हॉली’च्या शानदार शैलीने तीचा खेळ चमकत गेला. लवकरच ती देशाची नवीन ’स्पोर्टिंग आयकॉन’ बनली. 2006 पर्यंत ती पद्मश्री सानिया मिर्झा बनली होती.
सानियाच्या नावाने लोक त्यांच्या मुलींची नावे ठेवू लागले. त्यानंतर 2009 साल आले. निकालाच्या दृष्टीने तीची आवडती स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन सुरु होती. तिची महेश भूपतीसोबतची जोडी मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. फायनलमध्ये नॅथली देसी आणि अँडी राम यांच्यात सामना होता. सानिया आणि महेश भूपती या जोडीने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. स्कोअरलाइनवर 6-3, 6-1 असा स्कोअर होता आणि सानियाच्या हातात तिचे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद होते.
4) सानियाने आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम जिंकले आहेत
महिला दुहेरीत, सानिया मिर्झाने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन जिंकले. त्याचबरोबर मिश्र दुहेरीत तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन जिंकले आहे.
5) भारतातीय महिला टेनिसमधील सर्वात मोठी स्टार
35 वर्षीय सानिया मिर्झा ही भारतातील सर्वात मोठी महिला टेनिस स्टार आहे, तिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत आणि मुलींच्या संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन, यूएस ओपन दुहेरीत विजेतेपद पटकावले आहेत. मिश्र दुहेरीतही सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन जिंकले आहे.
टेनिस कोर्टशिवाय सानिया मिर्झा सतत चर्चेत राहिली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न असो किंवा करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, कधी राष्ट्रगीतावरून झालेला वाद असो किंवा कपड्यांबद्दलच्या कमेंट्स, सानिया मिर्झा नेहमीच चर्चेत राहिली आहे.
6) अनेक दिग्गजांना चारली धुळ
सानिया दुहेरी आणि मिश्र दुहेरीसह महिला एकेरीचे सामनेही खेळली आहे. यामध्ये तीने तीच्यापेक्षा चांगली क्रमवारी असलेल्या अनेक खेळाडूंचा पराभव केला. तीने तिच्या एकेरी कारकिर्दीत स्वेतलाना कुझनेत्सोव्ह, वेरा झ्वोनारेवा, मॅरियन बोर्तोली, माजी नंबर वन मार्टिना हिंगीस, दिनारा सफिना आणि व्हिक्टोरिया अझारेंका या स्टार खेळाडूंचा पराभव केला आहे.
7) प्रत्येक वादाला चोख प्रत्युत्तर
सानिया टेनिस कोर्टावर उतरल्यावर पहिला वाद तिच्या ड्रेसवरून सुरू झाला. हा वाद कुठे पोहोचला याचा विचार करणे कठीण आहे. फतवा काढण्यापासून पुतळे जाळण्यापर्यंतच्या घटना घडल्या. हाय प्रोफाईल एंगेजमेंटनंतर ब्रेकअप आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबतचे तिचे लग्न हेही वादग्रस्त होते. आताही रोज कोणी ना कोणी त्याच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्न उपस्थित करतो. कोणी तीच्या कपड्यांवर तर कोणी विधानांवर.
अलीकडेच सानिया मिर्झाने तिचे आत्मचरित्र ’ऐस अगेन्स्ट ऑड्स’ प्रकाशित केले आहे, ज्यामध्ये या सर्व वादांचा उल्लेख आहे. मात्र, या वादांमधील सर्वात मोठे सत्य हे आहे की सानियाने प्रत्येक वादाला तीच्या खेळातील दमदार कामगिरी करुन उत्तर दिले आहे.