नवी दिल्ली – सध्या खाजगी भेटीवर भारतात आलेले केनियाचे माजी पंतप्रधान रायला अमोलो ओडिंगा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक दशकांपासून मैत्रीपूर्ण वैयक्तिक संबंध आहेत.
सुमारे साडेतीन वर्षांनंतर ओडिंगा यांना भेटू शकल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला. 2008 पासून भारत आणि केनिया या दोन्ही देशांमध्ये ओडिंगा यांच्याशी अनेकदा झालेल्या भेटीची तसेच 2009 आणि 2012 मध्ये व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा केली. भारत-केनिया संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी ओडिंगा यांना त्यांच्या भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छाही दिल्या.