मुंबई – एबी डीविलियर्सचा नवा अवतार मानला जात असलेला बेबी (ज्यूनिअर) एबी अखेर मुंबईच्या गोटात दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज मिस्टर 360 एबी डीविलियर्स याचा वासरदार असे संबोधले जात असलेल्या बेबी एबी म्हणजेच डीवाल्ड ब्रेव्हिस याला रॉयल चॅलेंजर बेंगळुरूकडून खेळायचे होते. मात्र, त्याच्यावर जास्त रकमेची बोली लावत मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतले. त्याची बेस प्राइस 20 लाख असलेल्या बेबी एबीला मुंबई इंडियन्सने पहिल्याच दिवशी खरेदी केले.
आयसीसीच्या नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या ब्रेविस याने सरस कामगिरी करून दाखवली होती. त्याने 6 सामन्यांत 506 धावा केल्या. ब्रेविसची तुलना ही एबी डीविलियर्ससोबत होत आहे.