नवी दिल्ली – गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपच्या दिग्गज नेत्या मृदुला सिन्हा यांचे बुधवारी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी सिन्हांना आदरांजली वाहिली आहे.
27 नोव्हेंबर 1942 रोजी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे जन्मलेल्या मृदुला सिन्हा सुरुवातीपासूनच जनसंघाशी जोडलेल्या होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांची गणना होत असे. कुशाग्र राजकारणी आणि हरहुन्नरी साहित्यिक अशी त्यांची ख्याती आहे.
ऑगस्ट 2014 पर्यंत त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य होत्या. 25 ऑगस्ट 2014 रोजी गोव्याच्या राज्यपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. 23 ऑक्टोबर 2019 पर्यंत मृदुला सिन्हांनी राज्यपालपद भूषवले. मृदुला सिन्हा गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. तसेच मृदुला सिन्हा यांचे पती राम कृपाल सिन्हा हे बिहार सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मृदुला सिन्हा यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केल्या जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली :
Smt. Mridula Sinha Ji will be remembered for her efforts towards public service. She was also a proficient writer, making extensive contributions to the world of literature as well as culture. Anguished by her demise. Condolences to her family and admirers. Om Shanti. pic.twitter.com/EmYWcFEb5g
— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनानंतर दु: ख व्यक्त केले. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जनतेच्या सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मृदुला सिन्हा कायम लक्षात राहतील. त्या एक उत्कृष्ट लेखिका होत्या. त्यांनी साहित्यासह संस्कृती क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांच्या निधनाने मी दु: खी आहे. त्यांच्या कुटुंबियं आणि चाहत्याप्रती सहानभुती आहे, अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली आहे.
गृहमंत्री अमित शहा व्यक्त केले दुःख
गोवा की पूर्व राज्यपाल व वरिष्ठ भाजपा नेता मृदुला सिन्हा जी का निधन बहुत दुःखद है। उन्होंने जीवन पर्यन्त राष्ट्र, समाज और संगठन के लिए काम किया। वह एक निपुण लेखिका भी थी, जिन्हें उनके लेखन के लिए भी सदैव याद किया जाएगा। उनके परिजनों के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ। ॐ शान्ति
— Amit Shah (@AmitShah) November 18, 2020
गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट केले की, ‘गोव्याच्या माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेत्या मृदुला सिन्हा यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांनी आयुष्यभर राष्ट्र, समाज आणि संघटनेसाठी काम केले. त्या एक उत्कृष्ट लेखिका देखील होत्या. लेखनशैलीसाठी त्या नेहमी लक्षात राहतील. त्यांच्या निधनाबद्धल माझ्या सद्भावना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत.