राजगुरूनगर (पुणे) – खेड पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर यांची ॲट्रोसिटीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे.
वाळद ग्रामपंचायत येथील माजी सरपंच मिना लक्ष्मण काठे यांनी भगवान पोखरकर यांचे विरुद्ध 2016 मध्ये ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत खेड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती, त्यावरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता.
सरकारीपक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले होते. ही तक्रार खोटी व राजकीय द्वेषापोटी भगवान पोखरकर यांचे विरुद्ध दाखल केली, अशी भगवान पोखरकर यांचे वकील ॲड. सुमित निकम, ॲड. विश्वास दौंडकर, ॲड. सागर थोरात यांनी बाजू मांडली. सरकारी पक्ष व बचाव पक्षाच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी भगवान पोखरकर यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.