राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या आयोजित राजा शिवछत्रपती चषक क्रिकेट स्पर्धेत चाकण संघाने प्रथम क्रमांक पटकावला खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी वतीने पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्यावतीने कडूस येथील योगेश धायबर क्रीडा मैदानावर क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये वाडा, डेहणे, कडूस, कुडा, खेड, चाकण, खरपुडी व पाईट या 8 बीटमधील प्राथमिक शिक्षकांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत चाकण संघाने संघाने प्रथम क्रमांकाचा चषक व रोख बक्षीसाचा मान मिळवला. पाईट संघ उपविजेता ठरला खरपुडी बिट संघ तिसरा, डेहणे संघाने चतुर्थ क्रमांक मिळवले. क्रिकेट स्पर्धांसाठी खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,
विस्ताराधिकारी जीवन कोकणे, महाराजा कबड्डी संघ राज्य अध्यक्ष राजकुमार राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल पलांडे शहाजी पवार, युवराज थोरात, अशोक कर्डिले, चंद्रकांत खैरे, दत्तात्रय बारणे, सचिन गावडे, दत्तात्रय शिनगारे, अनिल तळपे, शिक्षक सोसायटी सभापती अशोक सावंत, उपसभापती सहिर सिकीलकर, सचिव विवेकानंद गायकवाड मान्यवरांसह प्राथमिक शिक्षकांनी भेट देऊन खेळाडू शिक्षकांना प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेत मालिकावीर राजेश कराळे, सामनावीर साहिल शिकीलकर,उत्कृष्ट फलंदाज अशोक फसले,उत्कृष्ट गोलंदाज रोहिदास मांजरे,उत्कृष्ट यष्टिरक्षक दिलीप देशमुख, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संदीप शेलार यांनी प्राविण्य मिळवले तर गुणलेखक व निवेदक श्याम बारणे, शिवाजी नवले यांनी केले