राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड (राजगुरूनगर) तालुका बार असोसिएशनच्या तब्बल 56 सदस्यांची नुकतीच भारत सरकार नोटरीपदी नियुक्ती झाली आहे. खेड बार असोशिएशनमध्ये जवळपास 500 वकील सदस्य आहेत. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय असल्याने येथील न्यायालयात वकिलांची संख्या मोठी आहे पुणे-मुंबई, नाशिक, नगर आदी भागांतून अनेक वकील येथे येतात.
चाकण एमआयडीसी, खेड सेझ, नवीन प्रकल्प यामुळे खेड तालुक्यात अनेक व्यवहार होत आहेत त्यासाठी नोटरी असलेल्या वकिलांची मोठी गरज असते. यापूर्वी राजगुरूनगर न्यायालयात जवळपास 20 ते 30 वकील नोटरीचे काम करीत होते. नुकतीच राजगुरूनगर तालुका बार असोसिएशन तब्ब्ल 56 सदस्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नोटरीची सेवा तत्परतेने, सहज मिळणार आहे.
राजगुरूनगर तालुका बार असोसिएशन अॅड. संजय पानमंद, अॅड. नवनाथ गावडे, अॅड. देविदास शिंदे, अॅड.राहुल वाडेकर, अॅड. अमोल घुमटकर, अॅड. संतोष दाते, अॅड.सुखदेव पानसरे, अॅड. विजय शिंदे, अॅड. दीपक चौधरी, अॅड. संदीप घुले, अॅड. दत्तात्रय लिंभोरे, अॅड. सुयोग शेवकरी, अॅड. नजिम शेख, अॅड. अर्चना किर्लोस्कर,
अॅड. अश्विनी मडके, अॅड. सोनम शिंदे, अॅड. हर्षदा कराळे, अॅड. मनीषा टाकळकर, अॅड. रिना मंडलिक, अॅड. अर्चना राक्षे, अॅड. संतोष तळेकर, अॅड.प्रकाश तळेकर, अॅड. राजेश परदेशी, अॅड. पुष्कराज परदेशी, अॅड. कैलास परदेशी, अॅड. स्मिता शिंदे, अॅड. स्वाती उपाध्ये, अॅड. मनोहर जंबुकर, अॅड. अभिजित जाधव, अॅड. सचिन साबळे, अॅड. संदीप गावडे, अॅड. विजयकुमार भगत,
अॅड. आरती टाकळकर, अॅड. अमोल ताजणे, अॅड. अतुल गोरडे, अॅड. मोहिनी केदारी, अॅड.गणेश सांडभोर, अॅड. योगेश साबळे, अॅड. नवनाथ भुजबळ, अॅड.शितल बडदे, अॅड. प्रकाश थिगळे, अॅड. सुभाष कड, अॅड. राहुल तांबे, अॅड. अरूण मुळुक, अॅड. वैभव कर्वे, अॅड. पांडुरंग राऊत, अॅड. नामदेव वीरकर, अॅड. मनिषा वाघ, अॅड. आरती टाकळकर, अॅड. श्रीकांत कड, अॅड. गणेश साबळे, अॅड. सचिन साबळे, अॅड. संगिता लांडगे, अॅड. बाळासाहेब लिंभोरे, अॅड. मंदार दीक्षित या सदस्यांना भारत सरकारची नोटरीपदी नियुक्ती झाली आहे