मुंबई – बॉलीवुड एक्ट्रेस करीना कपूर सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते, ती नेहमी सोशल मीडियावर फोटो तसेच तिच्या नी पर्सनल लाइफ शेअर करत असते. अनेक मुलाखतींमध्ये ती तिच्या कुटुंबाबद्दल अनेक खुलासेही करते.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, करिनाने तिच्या कुटुंबाच्या जेवणाबद्दलच्या प्रेमाबाबत सांगितले. टेलिकास्ट झालेल्या मुलाखतीत करीना कपूर कुटुंबासाठी, चित्रपटांसाठी किंवा जेवणासाठी काय महत्त्वाचे आहे हे सांगताना दिसत आहे. ती कपूर कुटुंबाची आवडती डिश देखील सांगते, ज्याचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब ‘एकत्र’ होते.
कपूर कुटुंबीयांसाठी ‘खाणे की अभिनय’ अधिक महत्त्वाचे आहे का, असे मुलाखतीदरम्यान विचारले असता? यावर करीना कपूर म्हणाली, “उत्तर देणे खरोखरच खूप कठीण आहे कारण दोन्ही गोष्टींसाठी प्रेम आणि उत्कटता आहे, कुटुंबासाठी, दोघांनाही सर्वोच्च प्राधान्य आहे.” “जेवण ही देखील मोठी चर्चा आहे.” त्याच वेळी, करीनाने कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या डिशबद्दल देखील सांगितले. करीना म्हणते, “मला सर्वजण भेटू तेव्हा खायला आवडते ती म्हणजे पाय सूप.. ”
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, करीना कपूर आमिर खान स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटात शेवटची दिसली होती. ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट टॉम हँक्स स्टारर ऑस्कर-विजेता हॉलीवूड चित्रपट फॉरेस्ट गंप (1994) चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. करिनाच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये हंसल मेहताचा चित्रपट आणि सुजॉय घोषच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी कादंबरीचा रिमेक यांचा समावेश आहे.