मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
मात्र, सध्या अभिनेत्री तिच्या नवीन शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ या शो मुळे चांगलीच चर्चेत असल्याचं दिसून येत आहे. मलायकाला नेहमीच हटके काहीतरी करण्याची सवय आहे. मलायका नेहमी आपला वेगळा रुबाब सर्वांना दाखवून देत असते. या नव्या शोमध्ये देखील मलायका काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतंच या शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, यामध्ये मलायका अरोरा आणि तिची बहीण अभिनेत्री अमृता अरोरा एकत्र दिसत आहे.
प्रोमोमध्ये या दोघी बहिणींमध्ये मोठं भांडण झाल्याचं पाहायला मिळतंय. ‘तू एक चांगली बहीण कधी होणार?’ असं यावेळी मलायका अमृताला विचारत असून, तिच्या डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळत आहेत. व्हीडिओमध्ये मलायका बीचवर रडत बसलेली असून, ती अमृताला म्हणाली, ‘जेव्हा मी माझ्या आयुष्यात सर्वात कठीण टप्प्यातून गेले, तेव्हा मला माझी बहीण म्हणून तुझी सर्वात जास्त गरज होती. तू तिथे नव्हतीस. तू एक चांगली आई, पत्नी आणि मैत्रीण आहेस, पण तू एक चांगली बहीण कधी होणार?’ असं ती अमृताला म्हणते. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.