चिंबळी – अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या मकरसक्रांती सणाच्या निमित्ताने खेडच्या दक्षिण भागातील गावांमध्ये सुगडी विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, माहागाईच्या झळा सुगडीलाही बसल्या असल्याने त्याच्या किंमती वाढल्या आहेत. संक्राती बनवण्यासाठी कुंभार व्यावसायिकांना नदीमधील गाळाची सुपीक माती लागते.
त्यासाठी बाहेर गावारून माती विकत आणून कुरुळी, मरकळ परिसरातील कुंभारवाड्यात सुगडीचे सुडगी बनवतात. सध्या महागाईची झळ सर्वच क्षेत्रांना बसली आहे. त्यामुळे व्यवसायिकांना कच्चामाल दुप्पट किंमतीत विकत घ्यावा लागतोय.
सध्या कुंभार व्यसायिक मातीच्या संक्राती बाहेरगावावरूनही मागवत आहेत. संक्रांतीमध्ये छोट्या-मोठ्या आकारानुसार दर आहेत. सध्या 20 ते 30 रुपये दराने पाच सुगड्यांचे नग विक्री केले जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.