मंचर – मंचर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत लाखणगांव येथील तीन आणि अवसरी खुर्द गावातील दोन अशा एकूण पाचजणांना खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातून तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी दिले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
ज्ञानेश्वर दगडू पाटील (वय 30), संदीप दगडू पाटील (वय 25), विशाल लक्ष्मण मिंडे (वय 25, तिघे रा. लाखणगाव) व आशिष बाळासाहेब वाव्हळ (वय 21), शुभम गोरक्षनाथ जाधव (वय 20, रा. अवसरी खुर्द) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.