पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे मुंबईहून आलेल्या पहिल्या करोनाबाधित रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने पारगाव आता करोनामुक्त झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
पारगाव (ता. आंबेगाव) येथे मुंबई (घाटकोपर) येथून 16 मे ला ही व्यक्ती आली होता. त्यांच्या कुटुंबात तीन व्यक्ती होत्या. ग्रामपंचायतीने या व्यक्तीचे 18 दिवस शाळेमध्ये विलगीकरण करण्यात आले होते; परंतु 2 जूनला या व्यक्तीस त्रास होऊ लागल्याने पुणे येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 जूनला या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, आज (दि. 12) या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागामार्फत पुढील 14 दिवस होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.
पारगाव येथे हा पहिला करोना रुग्ण सापडल्याने उपविभागीय अधिकाऱ्यां येथील भाग कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.आतापर्यंत बाहेर गावाहून आलेल्या 40 कुटुंबातील 120 व्यक्तीपैकी काहींचे घरातच विलगीकरण केले, तर काहींना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले होते. कंटेन्मेंट झोनच्या काळात अत्यावश्यक सेवा ग्रामस्थांना स्वयंसेवकांमार्फत पुरविण्यात आल्या.
यावेळी सरपंच बबनराव ढोबळे, ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे, अंजूषा ढोबळे, माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण ढोबळे, मुख्याध्यापक संतोष लबडे, काळुराम लोंखडे , दत्तात्रय वाव्हळ, मधुकर दातखिळे, रामहरी पोंदे, रोहिदास लोंढे, सुधाकर लोखंडे, बाळासाहेब दातखिळे आशा वर्कर विजया शेलार, मीना लबडे, राणी लोले, भरत कोल्हे उपस्थित होते. पारगाव हे पूर्व भागातील मुख्य बाजार पेठ असून, नागरिकांची सतत वर्दळ असते. ग्रामपंचायतीने कडक नियम केले, प्रशासनाची साथ मिळत आहे.