पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी पहिल्या नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होणार आहे. यात आता विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्याची ऑनलाइन सुविधाही सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल.
या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 हा 12 जूनपर्यंत भरता येणार आहे. तर प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी 15 जूनपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. यात विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंती क्रम नोंदवावे लागणार आहेत. यात कमाल दहा महाविद्यालयांचे पसंती क्रम देण्याची सुविधा असणार आहे. दि.19 जून रोजी या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आतापर्यंत अकरावी प्रवेशासाठी 63 हजार 33 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यातील 41 हजार 985 विद्यार्थ्यांनी अर्जाचा-भाग भरुन ते लॉकही केलेले आहेत. 19 हजार 389 अर्ज ऑटो व्हेरिफाइडही करण्यात आलेले आहेत. मार्गदर्शन केंद्राद्वारे 18 हजार 179 अर्जांची पडताळणी करण्यात आलेली आहे.
31 भरलेले अर्ज विद्यार्थ्यांनी माघारी घेतले आहेत.