– संतोष कचरे
आंबेगाव बुद्रुक : कोविड १९ मुळे संचारबंदी आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेदिवस वाढत आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस खाते रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव करणे, विनाकारण बाहेर पडणे इत्यादी बाबी टाळण्यासाठी पुणे शहर आणि परिसरात संचारबंदी लागू केले आहे. तसेच नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. असे असतानाही अनेक नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत.
दत्तनगर चौक, आंबेगाव बुद्रुक येथे कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता सार्वजनिक रोडवर फिरताना नागरिक आढळून आले. त्यांच्याविरुद्ध संचारबंदी व तोंडास मास्क न लावणे, या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम गंगाधर सरोदे (वय – २८), जितेंद्र अमृतलाल बुदेचा (रा.धनकवडी), सुरज भिकाजी खोंड (वय – ३०, आंबेगाव) असे गुन्हा दाखल करण्यातआलेल्यांचीनावे आहेत.
ही कारवाई पोलिस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, सहा.पो. आ.सर्जेराव बाबर, पो. नि. वसंत कुंवर, पो. नि. गुन्हे विष्णु ताम्हाणे यांच्या मार्गदर्शाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर व पोलीस कर्मचारी कृष्णा निंबाळकर, नितीन धोत्रे, योगेश सुळ, तानाजी वाल्हेकर यांनी केली.
नागरिकांना वारंवार सांगूनही, तसेच कोरोना हा संसर्गजन्य रोग असून तोंडाला मास्क वापरले नाहीत. तर संसर्ग वाढू शकतो हे माहीत असतानाही नागरिक रस्त्यावर व सोसायटीत कोणतीही काळजी न घेता फिरणाऱ्या वर यापुढे गुन्हे दाखल करण्यात येतील.
– विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक(गुन्हे), भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन