श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये कुलगामच्या गुदर भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत जवानांना ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला घेराव घातला असून चकमक सुरुच आहे.
Jammu & Kashmir: 4 terrorists have been killed in the encounter between personnel of Indian Army, Central Reserve Police Force, police & terrorists in Gudder area of #Kulgam; Operation is still underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/2XFAcsLdGP
— ANI (@ANI) April 27, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील गुदर भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले. त्यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता चकमकीला सुरु झाली. यावेळी जवानांना ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. अद्यापही चकमक सुरु आहे.
याआधी देखील कुलगाम जिल्ह्यामध्ये जवानांना मोठे यश मिळाले होते. कुलगाम जिल्ह्यातील गुदर भागामध्ये रविवारी संध्याकाळी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरुन मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला. या चकमकीत एक मेजर जखमी झाला.