दौंड (प्रतिनिधी) – दौंड तालुक्यात करोनामुळे 78 वर्षीय महिलेचा सोमवारी (दि. 8) मृत्यू झाला. तालुक्यातील हा पाचवा बळी गेला तर दौंड शहरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
तसेच राज्य राखीव दलातील पाच जवानांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे गट क्रमांक 7 च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली खान यांनी सांगितले. राज्य राखीव दलातील जवानांसह 41 जणांची करोनाची तपासणी करण्यात आली असून त्या सर्वांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 5 जवानांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाली आहे.
यापूर्वीच्या सर्व जवानांनी तर एका व्यक्तीने करोनावर मात केली आहे.