रावणगाव – रावणगावचे मुगाजी रामचंद्र आटोळे हे शिर्सुफळ (ता. बारामती) येथील परिसरात राणी व्हिक्टोरिया तलावाच्या शेजारी सायंकाळी मेंढ्या चारत असताना बिबट्याने मेंढ्याच्या कळपावर हल्ला करीत मेंढीला जखमी केले. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शिर्सुफळ, नंदादेवी, रावणगाव, खडकी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आत्ता स्पष्ट झाले आहे. आटोळे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बिबट्याने शिर्सुफळ तलवानजीकच्या उसाच्या शेताततून झेप मारत मेंढ्याच्या कळपावर हल्ला करीत मेंढीचा गळा पकडून तिला ओढत नेले. त्यावेळी चार कुत्र्यांसह मेंढपाळाने कुऱ्हाड आणि दगडांने मेंढीचा बचाव करीत बिबट्याचा हल्ला परतावून लावला. त्यामुळे अन्य मेंढ्या बचावल्या.