बलात्कारप्रकरणी बापाला जन्मठेप

कराड – पाटण तालुक्‍यातील जन्मदात्या बापाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापास 23 वर्षे 3 महिने जन्मठेप व 52 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे ऍड. मिलींद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. याबाबत सरकारी वकिलांनी सांगितले की, पाटण तालुक्‍यातील एक व्यक्ती घरातील सदस्यांना जीव मारण्याची धमकी देऊन स्वतःच्या मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. सलग दोन वर्षे हा अत्याचार पीडित मुलीवर सुरू होता.

एक दिवस आरोपी त्याचा मोबाईल घरात विसरून बाहेर गेला असता पीडित मुलीने त्या मोबाईलवरून मुंबईत असलेल्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीचे मामा तत्काळ गावी आले व त्यांनी पीडित मुलीसह तिची आई व बहिनींना घेऊन उंब्रज पोलीस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयितावर गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एम. के. आवळे यांनी केला. तपासानंतर एम. के. आवळे यांनी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षातर्फे ऍड. मिलींद कुलकर्णी यांनी सात साक्षीदार तपासले. उंब्रजच्या शासकीय रूग्णालयातील डॉ. राजगुरू, तपासअधिकारी एम. के. आवळे यांच्या साक्षी महत्त्वपुर्ण ठरल्या.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.