विद्युत शॉक बसल्याने वडिलांसह मुलाचा मृत्यू

मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील बाभूळसर बुद्रुक येथे विद्युत शॉक बसल्याने वडीलांसह मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्ताञय दगडू नागवडे (वय -50) प्रसाद दत्ताञय नागवडे (वय-16) दोघेही रा.बाभूळसर बुद्रुक ता.शिरूर अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत संतोष नारायण नागवडे यांनी मांडवगण फराटा दूरक्षेञात फिर्याद दिली आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की 01 जुन रोजी राञी 9.45 वाजता ओरडल्याचा आवाज आल्याने जाऊन पाहिले असता माझे चुलत भाऊ व त्यांचा मुलगा दोघेही घरासमोरील इलेक्ट्रिक पोलवरून आलेल्या वायरला चुकून स्पर्श झाल्याने व वायर ओली असल्याने त्या वायरला चुकून स्पर्श झाल्याने त्यांना विद्यूत शॉक बसल्याने त्यांना गाडीतून मांडवगण फराटा येथील वरदविनायक हॉस्पिटल मध्ये आणले.

परंतु दत्ताञय नागवडे हे उपचारापुर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. प्रसाद याला दौंड या ठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले होते उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.वरील घटनेचा पुढील तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरदेव काबुगडे, हवालदार रुपनवर, आबासाहेब जगदाळे, योगेश गुंड, अक्षय गुंड हे करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.