मिहिका-राणा लवकरच अडकणार विवाहबंधनात

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेता राणा डग्गुबाती हे सध्या चर्चेत आहे. अलीकडेच राणाने त्याची गर्लफ्रेंड मिहिका बजाजशी साखरपुडा केला होता. आता राणाचे वडील आणि निर्माता सुरेश बाबू यांनी सर्वांना आश्‍चर्यचकित केले आहे. त्यांनी या जोडप्याच्या लग्नाची तारीख निश्‍चित झाल्याचे जाहीर केले आहे.

सुरेश बाबू यांनी सांगितले आहे की, राणा आणि मिहिका 8 ऑगस्ट रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. राणा आणि मिहिका यांचा हा विवाहसोहळात दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत पार पडेल. सुरेश बाबू म्हणाले, सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून लॉकडाऊनही सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा विवाहसोहळा पार पडेल.

या महिन्याच्या सुरुवातीस राणा आणि मिहिका यांचा साखरपुडा झाला होता. मिहिका ही इंटिरियर डेकोरेटर आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते. मिहिकाबद्दल राणाने म्हणाला की, आमच्या दोघांमध्ये बरेच साम्य आहे. तसेच मिहिका आणि राणा यांच्या कुटुंबातील संबंधही खूप मैत्रीपूर्ण आहेत.
दरम्यान, राणा डग्गुबातीचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. विशेषतः “बाहुबली’ चित्रपटामुळे त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटामुळे बॉलीवूडमधील अनेक ऑफर्स्‌ त्याला मिळाल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.