पुणे – युवा खेळाडू निखिल दीक्षितने जलद बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटात अजिंक्यपद पटकाविले. त्याने सात फेऱ्यांमध्ये अपराजित्व राखताना साडेसहा गुणांची कमाई केली. ही स्पर्धा क्रीडा भारतीतर्फे आयोजित करण्यात आली होती.
निखिलने शेवटच्या फेरीत विकास शर्मा या तुल्यबळ खेळाडूविरूद्धचा डाव बरोबरीत सोडविला. विकास शर्मा, सिद्धांत गायकवाड, सौरव साहू, केवल निर्गुण यांचे प्रत्येकी सहा गुण झाले.
गत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे 2 ते 5 क्रमांक देण्यात आले. सौरभ म्हमाणे, ओम लामकाने, अनुज दांडेकर व प्रणव फडणीस यांना अनुक्रमे 6 ते 10 क्रमांक मिळाले. ज्येष्ठ खेळाडूंच्या गटात रवी बेहेरे, प्रकाश करमरकर व लक्ष्मण खुडे यांनी अनुक्रमे पहिली तीन पारितोषिके घेतली. महिलांमध्ये हा मान अनुक्रमे धनश्री खैरमोडे, श्रावणी हलकुडे व नेत्रा सावईकर यांना मिळाला. मुलांच्या 8 वर्षाखालील गटात प्रथमेशकुमारने विजेतेपद मिळविले. भुवन शितोळेने दुसरे स्थान घेतले तर शर्विन बडवेला तिसरा क्रमांक मिळाला. मुलींच्या गटात श्रेया ठाकूरला अजिंक्यपद मिळाले तर आर्या ठाकूरला दुसरा क्रमांक मिळाला.
मुलांच्या 10 वर्षाखालील गटात आर्यन सिंगाला हा विजेता ठरला तर आर्यन बालाजीरावला उपविजेतेपद मिळाले. मुलींमध्ये प्रतिती खंडेलवालने प्रथम क्रमांक मिळविला तर ख्याती जैनला दुसरे स्थान मिळाले. 12 वर्षाखालील मुलांमध्ये ओम सरोदे व साईराज गायकवाड हे अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकाचे मानकरी ठरले. मुलींमध्ये मानसी टिळेकरने पहिले बक्षीस घेतले तर देवयानी गौतमला दुसरे पारितोषिक देण्यात आले. 14 वर्षाखालील मुलांमध्ये मिहिर सरवदे व शार्दूल गोडबोले यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक घेतला. मुलींमध्ये श्रावणी म्हेत्रे विजेती ठरली.
पारितोषिक वितरण समारंभ पेसापालो क्रीडा संघटनेचे अध्यक्ष धनंजय जाधव, क्रीडा भारतीचे प्रांताध्यक्ष विजय पुरंदरे, फिडे प्रशिक्षक जयंत गोखले,आंतरराष्ट्रीय पंच राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते झाला. या वेळी क्रीडा संघटक शैलेश आपटे, आंतरराष्ट्रीय पंच विनिता श्रोत्री, दीप्ती शिदोरे, विजय रजपूत, मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.