लॉकडाऊनमुळे सध्या सर्व कलाकार सोशल मीडियाच्या मदतीने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. याचाच परिणाम रोज कोणा ना कोणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. सध्या सोशल मीडियावर एका स्टारकिडस्चा फोटो व्हायरल होतो आहे.
हा फोटो आहे बॉबी देओलचा मुलगा आर्यमान देओलचा. वडिलांसोबतचा त्याचा फोटो व्हायरल होतो आहे. ज्यात तो खूपच हॅंडसम दिसत आहे. विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉबी देओल आणि आर्यमानचा फोटो शेअर केला आहे. आर्यमान इतर स्टाककिडस् पेक्षा वेगळा आहे. मीडियापासून आणि लाईम लाईटपासून तो दूर राहणे पसंत करतो.
आर्यमानची पहिली झलक बॅंकॉकमध्ये झालेल्या आयआयएफए सोहळ्यावेळी बघायला मिळाली होती. या सोहळ्यात बॉबीसोबत आर्यमानने देखील हजेरी लावली होती. आर्यमान हा धर्मेंद्र यांचासारखाच हॅंडसम दिसतो, अशा प्रतिक्रिया येत आहेत. आजोबा धर्मेंद्र यांचा आर्यमान सर्वात लाडका असून अत्यंत जवळ आहे. आर्यमान अनेक वेळा आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच आर्यमानने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. आता तो बॉलिवूडमध्ये कधी डेब्यू करतो याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.