सातारा (प्रतिनिधी) – कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचारी जी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत होती तिच्यासह कराडच्या सह्यादी रुग्णालयातील २ यांचे निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे रविवारी त्यांना सोडण्यात आले. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील २ अशा एकूण ५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने या सर्वांना रुग्णालयातून आज सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील ५२, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ६४ अशा एकूण ११६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे बी. जे. वैद्य’कीय महाविद्यालयाने कळविले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ११ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे, अशा एकूण १२७जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ८, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ७५ अशा एकूण ८३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.