इंदापूर – विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील गुरुवारी (दि. 24) सायंकाळी श्री लक्ष्मी-नृसिंहाची पूजा करून दर्शन घेतले.
यावेळी मंदिराच्या सभामंडपात भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुक्यातील जनतेच्यावतीने सत्कार केला. श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या वतीने विश्वस्त अभय वांकर यांनी सत्कार केला.
याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. दशरथ राऊत यांनी प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चहा दिला.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, इंदापूरचे शहराध्यक्ष शकील सय्यद आदी उपस्थित होते.