मुंबई – बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर याने 24 डिसेंबर रोजी आपला 64 वा वाढदिवस साजरा केला. सध्या अनिल कपूर “जुग जुग जयो’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी पंजाबमध्ये आहे. यामुळे त्यांनी आपला वाढदिवस येथील सेटवरच साजरा केला.
अनिल कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनप्रसंगी पत्नी सुनीता कपूर, वरुण धवन, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोली हजर होते. वरुण धवन आणि कियारा आडवाणीने अनिल कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनिल कपूरने आपल्या वाढदिवसानिमित्त सेटवर एक छोटीशी पार्टी दिली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून यात अनिल कपूर केक कापताना दिसत आहे. अनिल कपूरला सेलेब्सनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनिलची मुलगी अभिनेत्री सोनम कपूरची एक पोस्टही व्हायरल होत आहे.
ज्यात ती आपले वडील अनिल कपूर यांना शुभेच्छा देत आहेत. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास अनिल कपूरचा “एके वर्सेज एके’ हा चित्रपट लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. हा एक कॉमिक थ्रिलर चित्रपट असून तो नेटफ्लिक्स रिलीज होणार आहे. यात अनिल कपूरसह अनुराग कश्यप मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे.