नगर – शहर मध्ये मनपा बांधकाम विभागाअंतर्गत विविध कामे सुरु आहेत. परंतु मार्च 2020 मध्ये करोना महामारीमुळे आलेल्या संकटामुळे विकासकामे करीत असताना विविध समस्या उध्दभवत असून विकास कामे करतांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने विकास कामांना सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी मनपा नोंदणीकृत ठेकेदार संघटनांनी आयुक्तांकडे केली आहे.
सध्या शहरात अनेक ठिकांनी लॉकडाऊन, कन्टेन्मेंट झोन असणे, वाहतुकीस परवानगी नसणे, तसेच अनेक कामगारांना करोनाची लागण झाली असल्याने विकास कामांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच शासकीय तंत्रनिकेतन यांच्या अखतारीतील मटेरियल चे टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्ट असतात परंतु तेथे कन्टेन्मेंट झोन असल्याने व तेथे कोविड सेंटर सुरु केल्याने कॉलेजमध्ये कर्मचारी वर्ग उपस्थित नसतात त्यामुळे टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्ट मिळण्यास अडचणी येत आहेत.
त्यामुळे कार्यरंभ असलेल्या कामांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर सुनील राऊत, अभिजित काळे, एस.एस.शेख, आनंद पुंड, राजेंद्र लोणकर, ए.पी. सोनीमंडलेचा, गणेश सप्लायर्स, बेस्ट कन्स्ट्रक्शन, अंबादास चोधरी, ए.सी कोठारी, विजयकुमार म्हस्के, अनिल वाबळे आदी ठेकेदारांच्या सह्या आहेत.