Narendra Modi In Ayodhya| लोकसभा निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यानंतर आता उर्वरित मतदार संघांसाठी राजकीय नेते प्रचार सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आज अयोध्येला भेट देणार आहेत. येथे ते राम मंदिरात रामललाचे दर्शन आणि पूजाही करणार आहेत. यानंतर त्यांच्या रोड शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यासाठी येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारासाठी अयोध्येत येत असल्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी त्यांनी रोड शो केला होता. तेव्हा नरेंद्र मोदींच्या या रोड शोमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, फैजाबादमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अयोध्या दौऱ्याला खास बनवण्याच्या तयारीत आहे. भाजपने येथून लल्लू सिंह यांना उमेदवारी दिली आहे, तर सपा-काँग्रेस आघाडीने अवधेश प्रताप यांना तिकीट दिले आहे. बसपा देखील रिंगणात आहे, ज्याने ब्राह्मण चेहरा म्हणून सच्चिदानंद पांडे यांच्यावर बाजी मारली आहे.
कसे असणार नियोजन ? Narendra Modi In Ayodhya|
– नरेंद्र मोदी आज रविवारी दुपारी 2:45 वाजता इटावाला पोहोचतील आणि 4:45 वाजता धारूहेराला पोहोचतील.
– यानंतर नरेंद्र मोदी संध्याकाळी 7 वाजता अयोध्येतील राम मंदिराला भेट देतील.
– त्यानंतर फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार लल्लू सिंह यांच्या समर्थनार्थ दोन किलोमीटरचा रोड शो करतील.
– गेल्या चार महिन्यांतील नरेंद्र मोदींचा अयोध्येतील हा दुसरा रोड शो असणार आहे.
हेही वाचा:
डोप टेस्ट न दिल्याने बजरंग पुनिया निलंबित, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशांना लागू शकतो ‘ब्रेक’