पाटणा – राष्ट्रीय जनता दलाने रविवारी पक्षविरोधी कारवायांबद्दल पक्षाच्या तीन आमदारांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली. राष्ट्रीय जनता दलाच्या पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली. गयघाटचे आमदार माहेश्वर प्रसाद यादव, पाटेपूरचे आमदार प्रेमा चौधरी आणि केओतीचे आमदार फरज फातमी यांना पक्षातून हाकलून देण्यात आले आहे. राजदचे नेते आलोक मेहता यांनी या कारवाईची माहिती दिली.
पक्षाच्या नियम क्रमांक 5 च्या उपकलम 33 नुसार पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्यामुळे या आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. पक्षाच्या अध्यक्ष्यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत आहे. या आमदारांबाबत मिळत असलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे, असे मेहता यांनी सांगितले.
बिहारमधील विधानसभेच्या निवडणूका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहेत. सध्याच्या विधानसभेची मुदत 29 नोव्हेंबर रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने करोनाच्या साथीमुळे अद्याप बिहारमधील निवडणुकांच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत. निवडणुकांबाबत आयोगाने राजकीय पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत.
“आयाराम’मुळे मंत्र्यांमध्ये चलबिचल
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर बिहारमधील शाम रजक हे राजीनामा देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. बिहारमधील सत्तारुढ संयुक्त जनत दल आणि मंत्रीपदाचा राजीनामा देऊन रजक हे राष्ट्रीय जनता दलामध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिहारमधील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांनी संयुक्त जनता दलामध्ये प्रवेश करण्याने रजक हे नाराज आहेत. चौधरी आता संयुक्त जनता दल-भाजप आघाडीच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. आपल्याला राजकारणच सोडून द्यायची ईच्छा असल्याचे रजक 28 ऑगस्ट रोजी म्हणाले होते. मात्र जेडियु आणि भाजपाच्या नेत्यांनी त्यांची समजूत घातली होती.