पुणे/महर्षीनगर (प्रतिनिधी) – प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. व प. पू. तीर्थेशऋषीजी म. सा. यांच्या पावन उपस्थितीमध्ये महावीर प्रतिष्ठान येथे जैन धर्मीयांच्या पर्युषणपर्वची उपासना चालू होती. या पर्वाची आज (दि. 22) सांगता झाली.
युगल धर्म संघाचे अध्यक्ष व जीतों एपेक्सचे उपाध्यक्ष विजय भंडारी यांनी उपस्थितांचे स्वागत करीत पर्युषणपर्वानिमित्त विविध कार्यक्रमांची, तसेच साधना सदन संघ, महावीर प्रतिष्ठान संघाच्या विस्तृत कार्याची माहिती सर्वांना दिली. याशिवाय येत्या काळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचीही माहिती त्यांनी दिली.
संवत्सरीच्या पावनप्रसंगी पूज्य गुरुदेव प्रवीणऋषी म. सा. यांनी क्षमा या लक्षणाचे आणि पर्युषण पर्वाचे महत्त्व विषद केले. संवत्सरीनिमित अंतरगढसूत्र, अलोयना प. पू. प्रवीणऋषी म. सा. यांनी वाचली. हा कार्यक्रम जगभरातील 15 हजारांपेक्षा अधिक लोकांनी यू-ट्युबच्या माध्यमातून पहिला. याप्रसंगी गौतमलब्धी फाउंडेशन व राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदऋषी म. सा. यांच्या चिंचोंडी प्रकल्पाची माहिती अनिल नहार यांनी दिली. यावेळी विजयकांत कोठारी, विजय भटेवरा, विजय भंडारी, पन्नालाल लुणावत, सुनील नहार, चेतन भंडारी, पंकज कर्नावट, अमित भटेवरा, सुरेंद्र संचेती, पवन भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.