मुंबई – प्रियांका चोप्राने बॉलिवूडबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्रास दिला जात असल्याची कबुली प्रियांकाने दिली आहे. बॉलीवूड सोडून हॉलिवूडमध्ये का गेले यावर प्रियांकाने भाष्य केले आहे. एका मुलाखतीत प्रियंकाने बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास नेमका कसा होता याविषयी सांगितले.
हवे तसे काम मिळत नसल्याने बॉलिवूड सोडले आहे. याशिवाय काही लोकांशी तिचे संबंधही बिघडले होते असं प्रियांकाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. प्रियंका चोप्राने अमेरिकेत सिंगर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2012 मध्ये तिने तिचे पहिले इंग्रजी गाणे इन माय सिटी लाँच केले. या गाण्यात तिच्यासोबत आंतरराष्ट्रीय गायक पिटबुलही होता.
हॉलिवूडमध्ये जाऊन प्रियांकाला खूप कालावधी उलटून गेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीपासून दूर हॉलिवूडमध्ये काम शोधण्यामागचे खरे कारण तिने आता सांगितले आहे. प्रियांका म्हणाली, “मला बॉलिवूड इंडस्ट्रीत बाजूला करण्यात आले. लोक मला कास्ट करत नव्हते, माझे लोकांशी भांडण होते, मला हे कस हॅण्डल करायचं कळत नव्हतं. मी त्यांच्याकडून होणाऱ्या राजकारणाला कंटाळले होते म्हणून मी तिथून निघून गेले असल्याचे प्रियांकाने सांगितले.
प्रियांका चोप्रा सध्या आपला पती निकसोबत विदेशातच राहते. गेल्या काही वर्षांमध्ये प्रियंकाने बॉलिवूडमध्ये तितकेसे सिनेमे केलेले नसले तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शिवाय ती आपल्या पतीच्या म्युजिक कॉन्सर्टमधे देखील हजेरी लावते. म्हणूनच प्रियांकाचे फॅनफॉलोविंग मोठे आहे.