मुंबई – मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध आणि दिग्गज गायक कुमार सानू यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांना आकर्षित करते. आता त्यांच्यानंतर त्यांची मुलगी शॅननही बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. ती लवकरच अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शॅनन ‘चल जिंदगी’ या डेब्यू चित्रपटाचे मोशन पोस्टर समोर आले आहे.
View this post on Instagram
‘चल जिंदगी’ हा रोड ट्रिपवर आधारित चित्रपट असणार आहे, ज्याचे दिग्दर्शन विवेक शर्मा करत आहेत. या चित्रपटात शॅननच्या विरुद्ध टीव्ही अभिनेता विवेक दहिया दिसणार आहे. त्याचबरोबर संजय मिश्रा, विवान शर्मा आणि मीता वशिष्ठ हे देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. विवेकचा शॅननसोबतचा हा डेब्यू चित्रपट आहे. याआधी त्याने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
मेकर्सनी 3 एप्रिल रोजी या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे, जे शॅननने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हा चित्रपट रोड ट्रिपवर आधारित असल्याने त्याची झलक या मोशन पोस्टरमध्ये स्पष्टपणे दिसते. शॅनन, विवेक दहिया आणि इतर स्टार्स बाइकवरून रोड ट्रिपचा आनंद लुटताना दिसत आहेत. शॅनन आतापर्यंत लाइमलाइटपासून दूर होती. मात्र, असे असूनही सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोअर्स आहे. इन्स्टाग्रामवर त्याला ३.४ मिलियन म्हणजेच ३४ लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. ती अनेकदा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते.