मुंबई – बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपली स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. विषय सामाजिक असो व राजकीय अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या सोशल मीडियावरून आपले म्हणणे मांडत असतात. अभिनेत्री स्वरा भास्कर त्यातीलच एक नाव. गेल्या काही दिवसांपासून स्वरा आपल्या विवाहामुळे प्रसिद्धी झोतात होती. पण आज ती चर्चेत येण्याचे कारण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी. राहुल यांचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर स्वराने एक ट्विट केले आहे.
आपले शब्द स्पष्टपणे मांडणाऱ्या स्वरा भास्करने नुकतीच राहुल गांधींची बाजू घेत त्यांना पाठिंबा देत सत्ताधारी पक्षांवर क्लास लावला आहे. तथाकथित पप्पूपासून ते किती घाबरले आहेत हे सिद्ध करण्यासाठी या कायद्याचा प्रचंड गैरवापर करण्यात आल्याचे अभिनेत्रीने तिच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत म्हंटले आहे.
स्वरा लिहिते, ‘त्यांना तथाकथित पप्पूची किती भीती वाटते. राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता आणि विश्वासार्हता आणि उंची रोखण्यासाठी या कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला आहे. राहुल गांधींना 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही म्हणून ही रणनीती आखण्यात आली आहे. पण त्यामुळे राहुल गांधींचा दर्जा आणखी वाढेल, असा माझा विश्वास आहे”
That’s how scared they are of so-called ‘Pappu’ ! Blatant misuse of law to ensure that @RahulGandhi ‘s growing popularity, credibility & stature are curbed and clear strong-arm tactics for 2024 Lok Sabha that RG now cannot contest.. My guess is RG will come out of this taller ✊🏽 https://t.co/GEsLrgQuOC
— Swara Bhasker (@ReallySwara) March 24, 2023
सुरत कोर्टाने राहुल गांधींना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे लोकसभा सचिवालयाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8 च्या आधारे राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले.यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते. बॉलिवूडमधून देखील याबाबत आता प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे.