मुंबई – बॉलिवूडमधील सर्वात फेमस कपल म्हणून रणबीर-आलिया हि जोडी प्रसिद्ध आहे. सध्या रणबीर त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे, तर आलिया आपल्या लेकीसोबत वेळ घालवत आहे. नुकतंच तिने आपल्या मुलीशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. आलिया रणबीरची लेक राहबाबत त्यांच्या फॅन्सला नेहमीच वाचायला आवडत. म्हणून आता स्टार किड्सच्या यादीमध्ये तिचे देखील नाव समाविष्ट झाले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने राहाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी शेअर केल्या ज्या तिला प्रत्येक आईप्रमाणेच सांगायला आवडतात. आलिया म्हणाली की राहाला ड्रेसअप करण्यापासून ते तिच्या सर्व गोष्टी करण्यामध्ये आई म्हणून तिला खूप आनंद मिळतो. आलियाने आई झाल्यानंतर बराच वेळ कामांमधून ब्रेक घेतला होता मात्र आता तिने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.
आलिया म्हणाली, ‘राहा अजून खूप लहान आहे. मला पुस्तके वाचायला आवडतात आणि या दरम्यान ती खूप लक्षपूर्वक ऐकते. राहाच्या या गुणामुळे तिला एका नव्या व्यवसायाची कल्पना सुचल्याचे आलियाने सांगितले. ती तिची बहीण शाहीनसोबत लवकरच एक स्टोरीबुक लॉंच करणार आहे. आलिया म्हणाली, ‘माझ्याकडे अनेक कल्पना आहेत, पण मी भाषेच्या पातळीवर फारशी सक्षम नाही. अशा परिस्थितीत मी कथा लिहू शकते. माझी बहीण शाहीन नक्कीच त्याचा एक भाग असेल.
आलियाने पुढे खुलासा केला की ती नऊ पुस्तकांची मालिका रिलीज करण्याच्या तयारीत आहे. ही मालिका आनंद, भावना आणि आशा या सर्व गुणांवर आधारित असेल. आलिया लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटात आलिया रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.