वाशिंग्टन – कार्यालयीन कामकाजाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये प्रेम संबंध निर्माण होणे ही नैसर्गिक बाब असली तरी, अमेरिकेतील कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून कंपनीच्या कामांमध्ये या प्रेमसंबंधाचा अडसर होऊ नये म्हणून अनेक लोकांना नोकरीवर जॉईन होण्यापूर्वी आता लव कॉन्ट्रॅक्ट साईन करावे लागत आहे.
या लव कॉन्ट्रॅक्ट मधील तरतुदीनुसार ऑफिसमध्ये प्रेम संबंध प्रस्थापित झालेले प्रेमिक कार्यालय मालमत्ता म्हणजेच ईमेल संगणक किंवा इतर वस्तूंचा वापर खाजगी कामासाठी करू शकणार नाहीत. ऑफिसमधील या प्रेमसंबंधचा परिणाम इतर कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर आणि कार्यक्षमतेवर पडत असल्याने अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून याबाबतची नियमावली तयार करण्यात आली आहे.
अनेक अमेरिकन कंपन्यांमध्ये अशा प्रकारचे नियम लागू करण्यात आले असले तरी आणि कर्मचाऱ्यांना लव कॉन्टॅक्ट साइन करणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी ऑफिसमधील प्रेम संबंधांचे प्रमाण कमी झालेली नाही. अमेरिकेतील सोसायटी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कंपनी या संस्थेने केलेल्या संशोधनातप्रमाणे अमेरिकेत दहापैकी एका जोडप्याचे प्रेम संबंध कार्यालयातच प्रस्थापित झालेले असतात.
करोना महामारीच्या कालावधीमध्ये या प्रेम संबंधांमध्ये सहा टक्क्याची वाढ झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. ऑफिसमध्ये प्रस्थापित झालेल्या या प्रेमसंबंधांमुळेह ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही वाढली आहे आणि रजा घेण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. लव काँट्रॅक्टमध्ये आम्ही स्वेच्छेने प्रेम संबंध किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करत आहोत आणि त्यामुळे कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही असे कर्मचाऱ्यांना लिहून द्यावे लागत आहे.