मुंबई – रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची लोकांना खूप उत्सुकता होती. अखेर दोघांचे लग्न ठरलेल्या वेळेनुसार अतिशय साध्या पद्धतीने पार पडले आहे. आलिया भट्टने रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले आहेत. 14 एप्रिल ला दुपारी ३ च्या दरम्यान दरम्यान त्यांनी फेरे घेतल्याची माहिती समोर आली आहे. आलिया भट्ट आता आलिया कपूर झाली आहे. मुंबईतील वास्तू बंगल्यावर हा विवाहसोहळा पार पडला.
लगीनगाठ बांधल्यानंतर आलियानं रणबीरसोबतचे फोटो शेअर केले. त्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत, सगळ्यांनीच नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यातच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या नवदाम्पत्याला अभिनेत्री दीपिका पादुकोण, कतरिना कैफ कशाप्रकारे शुभेच्छा देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. या दोघी रणबीर आणि आलियाच्या फोटोंवर काय कमेंट करतात याबद्दल अनेकांना उत्सुकता होती.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने रणवीर आणि आलियाला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत म्हंटले आहे की,’तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि हास्य कायम राहो, अशी कामना करते,’ यासोबतच लाल रंगाचा हार्ट इमोजीदेखील वापरला.
तर आलियानं शेअर केलेल्या फोटोंवर कतरिना कैफन कमेंट केली आहे की. ‘लग्नाबद्दल तुम्हा दोघांचं अभिनंदन. खूप खूप प्रेम आणि आनंद,’ तीन हार्ट इमोजी वापरले आहेत. सध्या त्यांच्या शुभेच्छांची चर्चा सर्वत्र आहे.