प्रभुदेवा याने मुंबईतील फिजिओथेरिपिस्ट डॉ. हिमानीसोबत लॉकडाऊनदरम्यान मे महिन्यात गुपचूप लग्न केले आहे. मुंबईतील साकीनाका येथील रहिवासी असलेली हिमानी आणि प्रभुदेवा हे विवाहबंधनात अडकले आहेत.
या दोघांची भेटही मुंबईतच झाली. प्रभुदेवाच्या पाठ आणि पायाच्या उपाचारावेळी या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. यानंतर दोघांमधील मैत्री घट्ट झाली आणि ते प्रेमात पडले. दरम्यान, या वर्षी मार्च महिन्यात दोघे चेन्नईत आले आणि लग्नापूर्वी दोन महिने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिले. चेन्नई येथे प्रभुदेवा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमात केवळ जवळचे मित्र सहभागी झाले होते. या लग्नाच्या वृत्ताला प्रभुदेवाचा मोठा भाऊ राजू सुंदरम याने पुष्ठी दिली आहे. राजू सुंदरम म्हणाले, वेल, आपल्याकडे डिटेल्स आहेत. आम्ही सर्वजण प्रभुदेवाच्या लग्नामुळे खूप आनंदी आहोत. दरम्यान, प्रभुदेवाचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पत्नीशी त्याचा घटस्फोट झालेला आहे.