बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर हा तीन ते चार वर्षांपासून “ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा बॉलीवूडमधील सर्वाधिक बिग बजेट असलेला चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यासारखे दिग्गज कलाकार आहेत. या चित्रपटाचे अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शन केले आहे.
View this post on Instagram
“ब्रह्मास्त्र’च्या स्पेशल इफेक्ट्सचे सध्या काम सुरू आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मितीचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. यापूर्वी चित्रपटाची अनेक वेळा रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे असून करोना व्हायरसमुळे चित्रपटाचे कामही प्रभावित झाले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू आहे.
View this post on Instagram
दरम्यान, “दिल बेचारा’, “सडक-2′, “गुंजन सक्सेना ः द कारगिल गर्ल’, “छलांग’ यासारखे अनेक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत. यात आता आणखी एका चित्रपटाचे नाव निश्चित मानले जात आहे. “ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची ऑफर हॉटस्टारने दिली असल्याचे समजते. यासाठी हॉटस्टार मोठी रक्कम मोजण्यास तयार आहे. परंतु करण जोहरने याला अद्याप होकार दिलेला नाही.