Entertainment – केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या सोमवारी झालेल्या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर अभिनेत्री ईशा गुप्ता नवीन संसद भवनात पोहोचली. जिथे ईशा गुप्ताने निवडणूक लढवण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं.
अनेक धमाकेदार बॉलिवूड चित्रपट आणि ‘आश्रम 2’ या वेब सीरिजमध्ये ईशाचा मादक अंदाज दिसून आला. दरम्यान, ईशा गुप्ताने महिला आरक्षण विधेयकाच्या मंजुरीबाबत मोकळेपणाने मीडियाशी संवाद साधला. यावेळी इशा म्हणाली, “पीएम मोदींनी केलेले हे खूप चांगले काम आहे. जे आपल्या देशासाठी एक मोठे पाऊल आहे.” ( Esha Gupta, Bollywood , Women’s Reservation Bill, )
दरम्यान, जेव्हा इशा गुप्ता ला ती निवडणूक का लढवणार का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा इशा गुप्ता हसत हसत म्हणाली, “नक्कीच, नक्कीच… होय, मी नक्कीच निवडणूक लढवणार आहे.” आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की ती कधी आणि कुठून निवडणूक आहे. ( Esha Gupta, Bollywood , Women’s Reservation Bill, )
सध्या ईशा गुप्पा तिच्या नवीन गाण्यासाठी देखील चर्चेत आहे. ज्यामध्ये ती बिग बॉस OTT 2 विजेता एल्विश यादवसोबत दिसणार आहे. अभिनयासोबतच ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. जिथे ती दररोज तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. ( Esha Gupta, Bollywood , Women’s Reservation Bill, )