भवानीनगर – काटेवाडी (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, सदस्य राजू भिसे, समीर मुलाणी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष के. टी. जाधव, अनिल काटे, प्रकाश काटे, अमर सुपेकर, रणजित काटे, हसण तांबोळी, पोलीस पाटील सचिन मोरे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या वतीने स्मशानभूमी येथील संरक्षक भिंतीच्या कडेने वृक्षारोपण करण्यात आले. दीपनगर, मासाळवाडी येथे वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात आला.
अजित पवार यांची पर्यावरणाबाबत सजगता आहे. ते कार्यक्रमात वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी कार्यकर्त्यांना आवाहन करतात, त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले.