#ENGvIND Test Series : टीकेची चिंता नाही – रहाणे

लिड्‌स : -लोक माझ्याबद्दल बोलत असल्याचा आनंद आहे. लोक केवळ महत्त्वाच्या व्यक्तींबद्दलच चर्चा करतात. परंतु, लोकांच्या टीकेची मला चिंता नाही. संघासाठी योगदान देणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे मला वाटते. 

मी आणि पुजारा बराच काळ क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे दडपण कसे हाताळायचे, अवघड परिस्थितीत चांगली कामगिरी कशी करायची, हे आम्हाला ठाऊक आहे. आमच्यासाठी स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाचे यश जास्त महत्त्वाचे आहे. 

केवळ संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे म्हणाला. 

पुजारा संथ फलंदाजी करत असल्याने त्याच्यावर नेहमी टीका होते. परंतु, त्याने 200 चेंडू खेळून काढले आणि हे खूप महत्त्वाचे ठरले, असेही रहाणेने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.