एनकाऊंटर फेम प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एनकाऊंटर फेम प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत संध्याकाळी सहा वाजता प्रदीप शर्मा हातावर शिवबंधन बाधणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रदीप शर्मा यांना विधानसभा निवडणुकीसाठी नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता आहे. नालासोपाऱ्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मुद्दा लक्षात घेता प्रदीप शर्मा यांना शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चिन्हं आहेत.

निवडणूक लढवण्याच्या तयारीत असले तरी शर्मा यांच्यावर बहुचर्चित लखनभय्या प्रकरण काही केल्या पाठ सोडत नाही. कारण या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे लखनभय्या यांचे बंधू शर्मा यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. गृह मंत्रालयाने शर्मा यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर केला. त्याबाबत गृहमंत्रालयाने राज्याच्या महासंचालक कार्यालयाला पाठवलेल्या गोपनीय पत्रात लखनभय्या प्रकरणाचा उल्लेख आहे. या प्रकरणात 21 आरोपींना सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. एकटे शर्मा निर्दोष ठरले होते. या निकालाविरोधात ऍड. गुप्ता यांच्यासह राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले. मध्ये उच्च न्यायालयाने ते दाखल करून घेतले. या अपील याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत शर्मा यांना निवृत्तिवेतन मिळणार नाही, असे या पत्रात नमूद आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)