जान्हवीला लागले लग्नाचे वेध

जान्हवी कपूर सध्या “गुंजन सक्‍सेना’ या आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. याच दरम्यान दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिने प्रोफेशनल गोष्टींबरोबरच काही पर्सनल गोष्टीही सांगितल्या.

मुलाबाबतच्या माझ्या आवडीनिवडी माझ्या आईला अजिबात पटत नव्हत्या. मी चांगली निवड करू शकेल, यावर तिला विश्‍वासच नव्हता, म्हणून माझ्यासाठी जोडीदार निवडण्याची जबाबदारी तिने स्वतःवरच घेतली होती. मी सहजपणे कोणाच्याही प्रेमात पडते. त्यामुळे माझी निवड चुकीची असू शकेल, असं तिला वाटत असायचं. असे जान्हवीने सांगितले. याच इंटरव्ह्यूदरम्यान आपला जोडीदार कसा असावा, हे देखील जान्हवीने सांगितले.

आपला “आयडियल पार्टनर’ खूपच टॅलेंटेड आणि कामाने झपाटलेला असायला हवा. त्याच्याकडून आपल्याला काहीना काही शिकायला मिळावे आणि त्याला चांगला “सेन्स ऑफ ह्युमर’ देखील असायला हवा. एवढेच नव्हे तर आपला हिरो आपल्यासाठी वेडा झालेला असायला हवा. असा जोडीदार शोधण्यासाठी आपण खूप एक्‍साईटेड असल्याचे ती म्हणाली.
तिने आपल्या लग्नाबाबत देखील नियोजन केले आहे. आपले लग्न तिरुपतीच्या मंदिरामध्ये व्हावे अशी तिची इच्छा आहे. जान्हवीला लागले लग्नाचे वेध

तिचे पप्पा बोनी कपूर यांनी मात्र अजून जान्हवीच्या लग्नाचा विषय देखील काढलेला नाही. मात्र ते जेव्हा या विषयावर चर्चा करायला लागतील, तेव्हा जान्हवीच्या या स्पष्ट कल्पना ऐकल्यावर तिच्यासाठी जोडीदार निवडणे किती अवघड असेल याची त्यांना कल्पना येईल. मग ते जान्हवीला मुलाची निवड करू देतील का ते स्वतःच जान्हवीसाठी जोडीदार शोधतील, हे बघण्यासाठी आणखी काही वर्षे थांबावे लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here