Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवादी (Terrorist) कारवायांचा जोर वाढला आहे. दोन दिवसापासून जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir)अनंतनागमध्ये लष्कर-दहशतवाद्यांमध्ये चकमक पाहायला मिळाली. या चकमकीनंतर आता बारामुल्लामध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्यात चकमक झाली. यात लष्कराने २ दहशवाद्यांचा खात्मा केला आहे.
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) बारामुल्ला जिल्ह्यात शनिवारी नियंत्रण रेषेजवळ (LoC) सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर काश्मीर जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील हातलांगा फॉरवर्ड भागात ही चकमक झाली. परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
लष्कराने खात्मा केलेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि ते कोणत्या दहशतवादी (Terrorist) संघटनेशी संबंधित होते हे अजून निश्चित झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही चकमक अशा वेळी घडली आहे जेव्हा अनंतनाग जिल्ह्यात जंगल परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा (Terrorist) शोध घेण्यासाठी लष्कराकडून मोहीम सुरु आहे.