entertainment news – अभिनेत्री करीना कपूर खान आणि शाहिद कपूर यांचा ‘जब वी मेट’ हा बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. 2007 मध्ये रिलीज झालेला हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. चाहते अनेकदा जब वी मेट चित्रपटाच्या सिक्वेलची मागणी करत असतात आणि अखेर चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. एका रिपोर्टनुसार, ‘जब वी मेट’च्या सिक्वेलची तयारी सुरू आहे.
वृत्तानुसार, ‘जब वी मेट’चा सिक्वेल राज मेहता गंधार फिल्म्स बॅनरखाली बनवणार. चित्रपटाच्या सिक्वेल व्हर्जनचे दिग्दर्शन इम्तियाज अली करणार आहेत. ‘जब वी मेट’चे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. ‘जब वी मेट 2’ बाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
‘जब वी मेट २’च्या चित्रपटाची स्टारकास्ट करीना कपूर खान आणि शाहिद कपूर त्याच्या भाग २ साठी पुन्हा एकत्र येणार आणि गीत आणि आदित्यची भूमिका साकारणार का, याचीही चर्चा सुरू झाली आहे. शाहीद कपूरने त्याच्या शक्यतेबद्दल थोडासा इशारा दिल्यावर इंटरनेटवर चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल अफवा पसरू लागल्या. रिपोर्ट्सनुसार, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शाहीदच्या एका चाहत्याने त्याला इम्तियाज अलीसोबतच्या त्याच्या वारंवार होणाऱ्या संभाषणाबद्दल विचारले. यावर शाहिद कपूर म्हणाला होता, ‘स्मार्ट बॉय.’
जब वी मेट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला होता. मात्र, त्यादरम्यान शाहिद कपूरला या आयकॉनिक चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये भूमिका साकारायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शाहिद म्हणाला की, हे मुख्यत्वे स्क्रिप्टवर अवलंबून असते. मूळ आवृत्तीशी स्क्रिप्ट सहज जुळते, तर नक्कीच पुढे येईल, असे शाहिद नमूद केले. एवढेच नाही तर शाहिदने त्याच्या जब वी मेट सह-अभिनेत्री करीनाचे कौतुक केले आणि तिच्याशिवाय गीतची भूमिका कोणीही साकारू शकणार नाही असेही त्याने सांगितले.