पंजाब – इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यातील अमेरिकन बनावटीचे अत्याधुनिक “अपाचे’ हेलिकॉप्टरचे शुक्रवारी पंजाबमधील होशिआरपूरमधील एका गावामध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. अमेरिकन बनावटीची ही हेलिकॉप्टर्स गतवर्षीच एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. 1
पठाणकोट एअर बेसवरून उड्डाण केल्यानंतर या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यामुळे वैमानिकाने होशिआरपूरमधील एका गावाच्या शेतामध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग केले. कंट्रोल पॅनलमध्ये वॉर्निंग अलर्ट आल्यामुळे खबरदारी म्हणून या हेलिकॉप्टरचे लॅंडिंग करण्यात आले, असे इंडियन एअर फोर्सकडून सांगण्यात आले.
क्रू पूर्णपणे सुरक्षित असून कुठलेही मोठे नुकसान झालेले नाही. अमेरिकन बनवाटीच्या अपाचे एएच-64ई या हेलिकॉप्टर्सचा मागच्यावर्षी हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला. मिसाइलने सुसज्ज असलेले हे हेलिकॉप्टर शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. हे लढाऊ प्रकारात मोडणारे हेलिकॉप्टर आहे.