Election Result 2023 – अजित पवार ( Ajit Pawar ) यांचा पायगुण भाजपसाठी चांगला ठरला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) यांनी दिली आहे. तीन राज्यात भाजपाला ( Bjp ) मिळालेल्या विजयावर ते बोलत होते. आजच्या पराभवाचे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी आत्मचिंतन करावे असा टोलाही यावेळी मिटकरी यांनी लगावला आहे.
दरम्यान मिटकरी पुढे म्हणाले की, काँग्रेस हवेत राहणारा पक्ष आहे. ते जोपर्यंत जमिनीवरून काम करणार नाही तोपर्यंत त्यांचे असेच हाल होणार आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रात्र आणि दिवस प्रचार करणारे संजय राऊत यांनी देखील आत्मचिंतन केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
जनतेचा कल अजितदादांकडे
शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांचा संसदीय अभ्यास जास्त आहे. सध्याचे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जनतेचा कल अजित पवारांकडे होता. आगामी काळात जनतेचा कल हा अजित पवारांकडेच असणार आहे. शरद पवार जे बोलतात नेहमी त्याच्या उलटे निकाल येत आहे. आम्हाला विश्वास आहे, भविष्यात महाराष्ट्रात चित्र वेगळे दिसेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.